Mohali Viral Video Case : मोहाली न्यूड व्हिडिओ प्रकरणात आता मुंबईचं नाव समोर आलं आहे. मुंबईत सध्या ६० मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मोहित नावाच्या संशियताला पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईमध्ये काही संशयास्पद स्क्रीनशॉटही मिळाले आहेत. आरोपी विद्यार्थीनी त्याच्या संपर्कात नसतानाही त्याला हे व्हिडिओ मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशातून अटक करण्यात आलेला संशियीत सनीला मुंबई आणि गुजरातमधून अनेक कॉल्स आलेले आहेत. त्यामुळं आता या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणातील मुख्य संशियीत आरोपी विद्यार्थीनीनं तिच्या बॉयफ्रेंडला जे व्हिडिओ पाठवले होते, त्यानंच मलाही सर्व अश्लिल व्हिडिओ पाठवल्याची कबुली आरोपी मोहितनं पोलिसांना दिली आहे. त्यामुळं आता पोलीस सनी आणि मोहित या दोघांना समोरासमोर घेऊन चौकशी करण्याची शक्यता आहे. याशिवाय त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले चार मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर शहरातील ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून हे व्हिडिओ शेयर करण्यात आले होते, त्या ग्रुप्सचा आणि ॲडमिनचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
नेमकं काय घडलं
पंजाबच्या मोहालीतील चंदीगड विद्यापीठातील तब्बल ६० मुलींचे अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका मुलीनं हे व्हिडिओ शूट केले. पोलिसांनी त्या विद्यार्थीनीला अटक केली आहे. परंतु आता या घटनेचे व्हिडिओ मुंबईतही व्हायरल होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे . त्या विद्यार्थीनीनं हे व्हिडिओ केवळ तिचा बॉयफ्रेंड सनीला शिमल्यातच नाही तर मुंबईतही पाठवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हे व्हिडिओ गुजरातपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









