सांखळीतील लोकांसोबत मुख्यमंत्र्यांनी ऐकली शंभरावी ‘मन की बात’
सांखळी : ‘मन की बात’ च्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधून प्रोत्साहन देताना लोकांचा आत्मविश्वास जागविण्याचे काम केले आहे. यामध्यमातून दिलेला स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारताचा नारा यशस्वी ठरत आहे . मन कि बात च्या माध्यमातून मोदींनी शंभर कार्यक्रम केले असून इतकावेळ जनतेशी संवाद साधणारे हे जगातील पाहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांचा हा जागतिक विक्रमच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात या शंभराव्या कार्यक्रमात साखळी खेडेकर सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत डॉ. सावंत यांनी उपस्थिती लावून मन कि बात ऐकली. यावेळी ज्येष्ठ नागरिक भीमराव देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, संजय नाईक तसेच ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. नवभारत घडवण्याची किमया मोदीजींनी साधलेली असून शेवटच्या घटकापर्यंत विकासाला चालना दिली आहे. मानव संसाधन निर्माण करण्यात तसेच कौशल्य विकास, लघूउद्योग, स्थानिक लोकांना प्रोत्साहन देताना गावागावात उद्योगशीलता निर्माण केली. नितळ गाव अभियान ते स्वस्थ भारतपर्यंत अनेक बाबतीत मोठे बदल घडवून आणले, असेही त्यांनी सांगितले. गोपाळ सुर्लकर यांनी स्वागत केले. गुऊप्रसाद नाईक यांनी आभार मानले.









