वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा केली. शनिवारी सायंकाळी दोघांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली. इजिप्त राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने फेसबुकद्वारे यासंबंधीची माहिती दिली. भारताचे पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांना फोन केला होता. यावेळी झालेल्या संभाषणात गाझापट्टीमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या लष्करी कारवायांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दूरध्वनीवरील चर्चेत दोघांनी नागरी जीवनावर होणाऱ्या विध्वंसक परिणामांबद्दलही आपापली मते मांडली. तसेच सद्यस्थिती युद्धाच्या वाढत्या धोक्मयांबाबतही विचारांची देवाणघेवाण झाली. अशा संघर्षांमुळे सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यावर दोघांचेही एकमत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.









