ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री फेक असल्याच्या चर्चांवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. असे असतानाच खा. संजय राऊत यांनी मोदींच्या डिग्रीबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये एका डिग्री सर्टीफिकेटचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. ही डिग्री मोदींची असल्याचा दावा करण्यात येत आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “काही लोक पंतप्रधानांची डिग्री फेक आहे असे म्हणतात. मला खरोखरचं असं वाटतं की ‘एंटायर पॉलिटिकल सायन्स’ या विषयातली डिग्री ही क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. म्हणूनच ही डिग्री नव्या संसदेच्या भव्य प्रवेशद्वारावर लावायला हवी. जेणेकरून लोकांच्या मोदींच्या डिग्रीबद्दलच्या शंका दूर होतील.”
अधिक वाचा : पुण्यात 9 ठिकाणी ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन








