राहूल गांधींची खासदारकी रद्द झाल्याची बातमी बाहेर येताच महाराष्ट्र राज्य विधीमंडळात आज विरोधी महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींच्या या बातमीचा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित करून सरकारच्या या कृतीचा कॉंग्रेससह महाविकास आघाडी निषेध करून सभात्याग करत असल्याचे घोषित केले. त्यानंतर मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह आमदारांनी विधीमंडळाचा सभात्याग केला.
विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले ” राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत न बसण्यासारखी आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशा प्रकारे खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे.” असे बोलून अजित पवार यांनी या घटनेचा धिक्कार केला.
Previous ArticlePMC Budget 2023 : पुण्यात 8 नवे उड्डाणपुल होणार
Next Article राजा शिवाजी विद्यालयाला लॅपटॉप प्रदान !








