I.N.D.I.A. बैठकीपूर्वी मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधींनी अदानीवरील आंतरराष्ट्रिय वृत्तपत्रांच्या बातम्यांचा संदर्भ देत भारतामधून एक अब्ज डॉलर्सहून अधिक पैसा बाहेर गेला असून वेगवेगळ्या ठिकाणी वितरित झाला होऊन परत भारतात आला. हा पैसा कोणाचा आहे याची चौकशी मोदी सरकार का करत नाही असा आरोप काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
राहूल गाधी सध्या मुंबईच्य़ा दौऱ्यावर आहेत. इंडीया आघाडीच्या मुंबई येथे होणाऱ्या तिसऱ्या बैठकीसाठी सोनिया गांधी यांच्यासह ते मुंबईत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या बैठकीपुर्वी राहूल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “ही आंतरराष्ट्रिय वर्तमानपत्रे भारतामधून एक अब्ज डॉलर्सहून अधिक पैसा बाहेर गेला असून वेगवेगळ्या ठिकाणी वितरित झाला होऊन परत भारतात आला असल्याचे सांगत आहेत. या आर्थिक घडामो़डीमुळे भारतातील गुंतवणुकीवर आणि उर्वरित जगाच्या भारताबद्दलच्या धोरणावर कसा परिणाम होत आहे याचे स्पष्टीकरण देत आहेत.” असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “यामध्ये पहिला प्रश्न पडतो कि हा पैसा कोणाचा आहे? यामागचा सूत्रधार विनोद अदानी नावाचा गृहस्थ गौतम अदानी यांचा भाऊ आहे. या पैशांच्या उलाढालीमध्य़े आणखी दोन व्यक्तींचा सहभाग असून एक नासिर अली शाबान अहली नावाचा गृहस्थ असून दुसरा चांग चुंग लिंग नावाचा चिनी गृहस्थ आहे.” असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“दुसरा प्रश्न असा निर्माण होतो कि, या दोन परदेशी नागरिकांना भारताच्या संपूर्ण पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवणाऱ्या एका मोठ्या कंपनीच्या मूल्यांकनाशीव छेडछाड करण्याची परवानगी का दिली जात आहे” असेही राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला. पुढे बोलताना त्यांनी “सेबीची चौकशी करून अदानी समूहाला क्लीन चिट देणारे गृहस्थ आता त्याच समूहाच्या मालकीच्या मीडिया कंपनीचे संचालक आहेत.” असा खुलासाही त्यांनी केला.








