नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मोदी सरकार सत्तेत येऊन आज (30 मे) सात वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये सांगण्यात आलंय की, आज कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करु नये वा कोणत्याही प्रकारचा उत्सव स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करु नये. त्या ऐवजी कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि कोरोना प्रभावित लोकांची मदत करावी.
मोदी सरकार सत्तेत येऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त देशातील सर्व भाजप आमदार आणि खासदार यांना एक महत्वपूर्ण जबाबदारी दिली गेली आहे. त्यानुसार त्यांनी गावागावातील लोकांपर्यंत पोहचून त्यांची मदत करावी असे सांगण्यात आले आहे. जेपी नड्डा यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या योजनेनुसार 20 मे रोजी पक्षातील नेते मंडळी 1 लाख गावांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान भाजपचे कार्यकर्ते गावातील लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि राशन सारख्या गरजेच्या वस्तूंचेवाट करणार आहेत. त्याचसोबत कोरोना पासून बचाव करण्यासंदर्भात जनजागृती सुद्धा करणार आहेत. ऐवढेच नाही तर केंद्रीय मंत्र्यांना कमीत कमी दोन गावांचा दौरा करावा असे सांगण्यात आले आहे. जर मंत्र्यांना व्यक्तिगत तेथे जाणे शक्य नसेल तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बैठक करावी असे आदेश दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









