शिवसेनेचे होऊ द्या चर्चा अभियान
वारणानगर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी योजनांच्या माध्यमातून जनतेलाच फसवल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यानी केला.पन्हाळा तालुक्यातील आवळी, काखे,सातवे, कोडोली या गावातशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियान राबविण्यात आले यामध्ये उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केंद्र व भाजपा शासित सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली.
घरगुती गॅसचा दर वाढवून जनतेला नऊ वर्षे लुटल्यावर दोनशे रुपये दर कमी केल्याचा ढोल भाजपा वाजवत आहे. पेट्रोल,डिझेल सह सर्वच प्रकारचे दर प्रमाणापेक्षा जादा वाढवून जनतेची लूट केली दुप्पट होणारे शेतकर्यांचे उत्पन्न झाले नाही शेतकरी आत्महत्या करू लागलेत, महिलां अत्याचाराचेप्रमाण वाढले आहे मनिपुर हाथरस आतंरराष्ट्रीय खेळाडू देखील यातून सुटलेले नाहीत असा आरोप ज्योती ठाकरे यांनी केला.
खात्यावर १५ लाख आले नाहीत प्रतिवर्षी दोन कोटी तरुणांना देण्यात येणारा रोजगार देखील मिळाला पाच वर्षात मिळाला नाही सरकारी भरती चा प्रवेश फॉर्मचा दर शंभर रुपयाचा दर एक हजार रुपये करून त्यामधून कोट्यावधी रुपये शासनाने मिळवले असून मोदी शासनाने प्रत्येकाला आधार कार्ड जोडा याशिवाय काही केले नाही आयुष्यमात भारत चा लाभ कोठे मिळतो कळत नाही अशा अनेक प्रश्नावर ज्योती ठाकरे यांनी टिका करीत उपस्थितांशी संवाद साधला.
प्रारंभी शिवसेना तालुका प्रमुख बाबासो पाटील यांनी स्वागत केले जिल्हाअध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी होऊ द्या चर्चा अभियानाचा मिळाल्या प्रतिसादाचा आढावा घेतला.उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी,शिव सहकार सेना संघटक वीरेंद्र पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख नितीन माने, विभाग प्रमुख संजय निकम, शहर प्रमुख स्वप्नील पाटील उप शहर प्रमुख अंकुश रोकडे अमोल पाटील, संदीप कापरे व सर्व शिवसैनिक कोडोली शहर सह ग्रामस्थ उपस्थित होते.