Modi Cabinet Expansion : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल २० जानेवारीला समाप्त होत आहे. नव्या अध्यक्षाची निवड आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जानेवारीत आयोजित करण्यात आली आहे. पुढील वर्षी ९ राज्यात विधानसभा निवडणुक होत आहेत. तर २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. गेल्या वर्षी ७ जुलै रोजी मोदी सरकारने दुसऱ्यांदा केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १२ मंत्र्यांना पदावरुन हटविण्यात आले होते.
दरम्यान, १४ जानेवारी नंतर मंत्रिमंडळ विस्तार, आणि फेरबदल होण्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांनी व्यक्त केली आहे. अर्थंसंकल्पाच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार, आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे. संघटना पातळीवर मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार, पक्ष, संघटना पातळीवर मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना आणि मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील काही खासदारांना गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. तर काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.भाजपने या वर्षी उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुरमध्ये बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. या चारही राज्यात भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









