ऑनलाईन टीम
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस आहे. यामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा यासह सर्वच क्षेत्रातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. याचनिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. भाजपा तीन आठवडे मोदींचा वाढदिवस साजरा करणार आहे. मागील वर्षी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच कोरोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.
यंदाच्या या कार्यक्रमाला सेवा आणि समर्पण अभियान असं नाव देण्यात आलंय. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांआधी येणाऱ्या मोदींच्या या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सात ऑक्टोबर २००१ रोजी मोदींनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पद अशी दोन महत्वाची पदं भूषवणारे मोदी सक्रीय राजकारणामध्ये २० वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळेच भाजपाने ७ ऑक्टोबरपर्यंत या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Previous Articleविसर्जनादिवशी महाद्वार रोडवर `नो इंट्री’
Next Article कोल्हापूर-मुंबई 50 टक्के फ्लाईट रद्द!









