वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. गेल्या दोन महिन्यात मोदींची स्तुती करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. एका पॉडकास्टमधील चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. ‘मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत खूप अस्थिर होता’ असा दावा करत ट्रम्प यांनी मोदींना आपले जिवलग मित्र आणि चांगले व्यक्ती असेही संबोधले. मोदी हे सर्वोत्कृष्ट माणूस आणि प्रतिभावान व्यक्ती असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी मोदींची नक्कलही केली. तसेच मोदींशी संबंधित काही आठवणीही सांगितल्या.









