प्रतिनिधी,कोल्हापूर
Dhananjay Mahadik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रांतील भाजप सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्याबद्दल भाजपच्या वतीने देशभरात मोदी @9 जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.त्याची शहरातील सुरूवात मंगळवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पेठेतून करण्यात आली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क अभियानाची सुरूवात शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकातून करण्यात आली.खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने संध्यामठ गल्लीतील घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील विकास योजना,प्रकल्प,उपक्रमांची माहिती माहितीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली.
याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव,जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई,मनपातील माजी विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी,माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे-पाटील, राजसिंह शेळके, किरण नकाते यांच्यासह विजय जाधव, हेमंत आराध्ये, राजू पागर, विजयेंद्र माने, सुनील वाडकर, संग्राम जरग, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, किरण नकाते, अद्वैत सरनोबत, गिरीश साळोखे,अप्पा लाड,डॉ. राजवर्धन, हर्षद कुंभोजकर,सुनील पाटील,अमेय भालकर,विवेक वोरा,राजू नरके,अजित सुरुवंशी,संजय सावंत,प्रकाश घाटगे,सचिन साळोखे, विजय दरवान,गायत्री राऊत,प्रभावती इनामदार,प्रमोदिनी हर्डीकर,भारती जोशी,किशोरी स्वामी,कोमल देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नऊवर्षांतील कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहविण्यासाठी अभियान
संपूर्ण देशभरात 20 ते 30 जून या कालावधीत हे महाजनसंपर्क अभियान सुरू होत असून पंतप्रधानांच्या यशस्वी नववर्ष कार्यकलामध्ये झालेल्या विकासाभिमुख कामांचा लेखाजोखा माहितीपत्रकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले.
देशभरात भाजपचे 400 खासदार निवडून आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. @9 जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून त्याची सुरूवात झाली आहे.
-धनंजय महाडिक, खासदार
पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यासाठी करा मिस्ड कॉल
90 90 90 2024 या फोन क्रमांक वर मिस कॉल देऊन पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन याप्रसंगी भाजपच्या वतीने नागरिकांना करण्यात आले.








