Mumbai Model suicide News : मुंबईतील (Mumbai) एका हॉटेलच्या रुममध्ये ३० वर्षीय मॉडेलने आत्महत्या (Suicide) केली आहे. तिने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना बुधवारी (28 सप्टेंबर) रात्री घडली आहे. याबाबत एएनआय़ या वृत्तसंस्थने ट्विट करत माहिती दिली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन गुन्हा दाखल केला आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर संबंधित मॉडेल संदर्भात विस्तृत माहिती अद्याप माहिती समोर आली नाही.
नेमकं काय घडलं
संबंधित मॉडेल ही अंधेरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. अनेक वेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाजा उघडला नाही. वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन कळवलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि मॉडेलच्या रुम मास्टर कीने उघडला. रुमचा दरवाजा उघडताच मॉडेल पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटले आहे
पोलिसांनी घटनास्थळावरुन एक सुसाईड देखील जप्त केली आहे. “माफ करा, याला कोणीही जबाबदार नाही, कोणाला डिस्टर्ब करू नका, मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती,” असं या मॉडेलने सुसाइड नोटमध्ये लिहिले होत.
Previous Articleअप्रशिक्षित शिक्षकांसाठी बारावीला ५० टक्के गुणांची सक्ती मागे
Next Article जिल्ह्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा









