पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांकरता निर्णय : दहशतवादविरोधी तयारीची चाचपणी होणार : पंजाबमध्ये 3 जून रोजी मॉक ड्रिल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार आहे. हा मॉक ड्रिल गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. यादरम्यान लोकांना सतर्क राहण्याची सूचना केली जाणार आहे. तर पंजाबमध्ये 3 जून रोजी मॉक ड्रिल केला जाणार आहे.
केंद्र सरकारने पंजाब, राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये (केंद्रशासित प्रदेश) मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 3,300 किलोमीटरपेक्षा अधिक लांब सीमा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आहे, तर पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हटले जाते.
गुरुवारी होणाऱ्या मॉक ड्रिलचा उद्देश संभाव्य दहशतवादी धोक्यांच्या विरोधातील तयारीची चाचपणी आणि ओलीस संकट किंवा दहशतवादी हल्ल्याच्या स्थितीत सुरक्षा यंत्रणांच्या प्रतिक्रिया रणनीतिचे मूल्यांकन करणे आहे. मागील मॉक ड्रिल्समध्ये देशभरातील विविध राज्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथक आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त कमांडोंनी दहशतवादी हल्ल्यासारख्या स्थितींचा अभ्यास केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारचे मॉक डिल्स अन्य प्रमुख स्थानांवरही जारी राहणार आहे, जेणेकरून कुठल्याही धोक्याच्या स्थितीत त्वरित, समन्वित आणि प्रभावी प्रतिक्रिया सुनिश्चित केली जाऊ शकेल असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
याचबरोबर हरियाणा सरकार देखील 29 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण राज्यात ‘ऑपरेशन शील्ड’ नावाने एक एक मोठी नागरी सुरक्षा मोहीम राबविणार आहे. हा ड्रिल राज्याच्या 22 जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी होणार असून याचा उद्देश आपत्कालीन स्थितीत तयारी आणि प्रतिसाद सुधारणे आहे.
यापूर्वी देखील केंद्र सरकारने पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान 7 मे रोजी देशाच्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याची घोषणा केली होती. परंतु 6-7 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अ•dयांवर सैन्य कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अ•s नष्ट केले होते. या कारवाईत शेकडो दहशतवादी मारले गेले होते. परंतु पाकिस्तानातील आणखी 12 दहशतवादी अ•dयांची यादी तयार आहे. पाकव्याप्त काश्मीरपासून पाकिस्तानातील दहशतवादी अ•s नष्ट करण्याचेही लक्ष्य बाळगण्यात आले आहे. तसेच भारत सरकार तसेच सैन्याने ऑपरेशन सिंदूर जारी असल्याचेही स्पष्ट केले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची भीती वाढली आहे. याचदरम्यान पाकिस्ताला ऑपरेशन सिंदूरप्रमाणे आणखी एका ऑपरेशनची भीती सतावत आहे. भारताने सध्या केवळ 9 दहशतवादी अ•dयांवर एअरस्ट्राइक केला आहे. अशास्थितीत पाकिस्तानात असलेल्या आणखी 12 दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले जाऊ शकते. दहशतवादाच्या अ•dयांना नष्ट केले जाणार असल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले होते. याकरता भारताची तयारी देखील पूर्ण आहे. भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. भारतीय सैन्याने काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.









