(साटेली भेडशी प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालमीच्या पार्श्वभूमीवर बुधवार 7 मे रोजी दुपारी तिलारी धरण क्षेत्रात खळग्यातील दगडी धरणावर तिलारी धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यातील महसूल,पोलीस प्रशासन,पाटबंधारे, अग्निशमन दल आदी प्रमुख विभागाच्या अधिकारी,कर्मचारी,पत्रकार यांच्या उपस्थितीत “मॉक ड्रिल” संपन्न झाला.यावेळी सलग दोन वेळा पंधरा मिनिटांच्या फरकाने सायरन वाजविण्यात आला.तसेच युद्धजन्य परिस्थितीची पार्श्वभूमीवर घ्यायची दक्षता,मार्गदर्शक सूचना याची चर्चा करण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते.









