पन्हाळा,प्रतिनिधी
Panhala News : पन्हाळा तालुक्यातील सात सज्जातील कोतवाल पदासाठी नुकतेच आरक्षण निश्चित करण्यात आले.आरक्षण पडल्यापासुन या आरक्षणाविषयी संपुर्ण तालुक्यातुन नाराजीचा सुरु उमटु लागला आहे.काही ठिकाणी चुकीचे आरक्षण पडले असुन, या आरक्षणाविषयी ओरड सुरु आहे.त्यातच या आरक्षणमध्ये बदल करुन फेरआरक्षण करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदिवासी स्टाँईलने तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी ‘फेरआरक्षण झालेच पाहिजे’तसेच प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणुन गेला.
पन्हाळा तालुक्यातील,पन्हाळा,कोतोली,कळे,आळवे,बोरपाडळे,वाघवे,देवाळे या सात सज्जातील कोतवाल पदासाठी आरक्षण टाकण्यात आले.यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळुन आले आहेत.बोरपाडळे या सज्जातील गावात एस.बी.सी आरक्षण पडणे गरजेचे होते.पण तेथे एस.टी या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.पंरतु शासन निर्देशानुसार एस.टी हेच एस.बी.सी आहेत. 2014 व 2017 ची कोतवाल आरक्षण सोडतीमध्ये त्रुटी होत्या.याचा गांभीर्याने विचार करुन ज्या सज्जातील आरक्षणात त्रुटी आढळुन आल्या आहेत.त्याठिकाणी फेरआरक्षण घ्यावे व लवकरात लवकर नविन आरक्षण जाहिर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली.
दरम्यान,दुपारी बारा वाजता बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्यापासुन मेनरोडवरुन,तारराणीमार्केट,पोलिस ठाणे अशा मार्गाने तहसिलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.तहसिलदार कार्यालय येथे मोर्चा धडकल्यानंतर त्यानंतर याठिकाणी जोरदार घोषणाबाजी व आदिवासी गाण्यावरील न्रुत्य करत या आरक्षण सोडतीचा निषेध करण्यात आला.यावेळी तहसिलदार माधवी शिंदे हजर नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.त्यानंतर शाहुवाडी-पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन या प्रकरणाची तपासणी करुन काही चुकीचे निर्देशनास येत असल्यास कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचे आश्वासन व उद्यापर्यंत तहसिलदारांना आपल्या आंदोलनाच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्याचे सुचना करण्यात आली असल्याचे समीर शिंगटे यांनी सांगितले. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केल्याचे जाहिर करण्यात आले.