न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी येथे होणाऱ्या टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला मनसेचा पाठींबा आहे.अशी भूमिका मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी दिला आहे.दरम्यान केवळ निवडणूका आल्या की,येथील राजकीय आजी माजी पदाधिकारी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करतात मात्र आता हे प्रयत्न थांबणे गरजेचे आहे.असे त्यांनी म्हटले आहे.श्री राऊळ यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे.त्यात असे म्हटले आहे की,सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम बरीच वर्षे रखडले आहे.त्याचबरोबर टर्मिनस संदर्भातील इतर समस्या घेऊन रेल्वे प्रवासी संघटना येत्या २६ जानेवारीला आंदोलन करणार आहे.यामध्ये मनसेचा देखील सहभाग असून या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री.राऊळ यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









