खेड/प्रतिनिधी
गणेशोत्सवात (ganesh festival) लकी ड्राॅ स्पर्धेसाठी नियमबाह्य रक्कम जमा करत फसवणूक केल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाच्या आयुक्तानीही मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (vaibhav khedekar) यांच्याविरोधात येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
यापूर्वी अरबाज बडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील मनसेच्या 3 पदाधिकाऱ्यांना ही येथील पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र समाजकल्याण विभागाच्या आयुक्तानीही तक्रार केल्याने खेडेकर पुन्हा गोत्यात आले आहेत. यामुळे खेडेकर यांच्यावर अटकेची तलवार कायम असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : रत्नागिरीत मैत्रिणीच्या फ्लॅटवर तरुणाची आत्महत्या









