ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi aditynath) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट होण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आणि ठाकरे यांची भेट होऊ शकते. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशाच्या (uttar pradesh) विकासाबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे कौतुक केले होते. तर औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला आज संध्याकाळ पर्यंत परवानगी मिळेल, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या विकासाबद्दल कौतुक केले होते. तसेच उत्तर प्रदेश मधील भोंगे उतरवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात भेट होऊ शकते. ५ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आयोध्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्या पूर्वी ४ मे रोजी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. ही भेट राजकीय समीकरण जुळवण्यासाठी होऊ शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. तसेच १० मे पर्यंत जमावबंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. मात्र या सभेत मनसे समोर काही शर्ती ठेवून सभेला परवानगी मिळेल असा अंदाज व्यक्त करणात येत आहे. त्यावर बोलताना मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आम्हीं पक्षांची ध्येयधोरणे काय आहेत? हे आम्ही ठरवणार. त्यामुळे पोलीस त्यांचे काम करू देत, आम्ही आमचे काम करतो. राज्य सरकाराला काय करायचे ते करू दे अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली.