छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाला पडझडीचे गेल्या काही वर्षापासुन ग्रहण लागले आहे.यावर्षी चार दरवाजा येथील ऐतिहासिक बुरुज ढासळल्याने पन्हाळ्याच्या संवर्धनासाठी सर्वस्तरातुन आवाज उठविण्यात येत आहेत. त्यानुषगांने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील आक्रमक भुमिका घेण्यात आली आहे.ऐतिहासिक पन्हाळगड व पावनगडाचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी सोमवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेत्तुत्व तालुका अध्यक्ष विशाल मोरे यांनी केले.
बाजीप्रभु पतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाजीप्रभु चौक पासुन मेनरोड, प्रांतकार्यालय, संभाजी महाराज मंदिर येथुन तहसिलदार कार्यालय पर्यंत मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी छ.शिवाजी महाराज की जय..!जय भवानी..जय शिवाजी..!हर ..हर ..महादेव च्या जयघोषाने पन्हाळगड दुमदुमुन गेला होता. तहसिलदार कार्यालयात तहसिलदार रमेश शेंडगे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात हलगीच्या कडकडाटसह घोड्यावर स्वार झालेले प्रतिशिवाजी महाराज, बनलेला मावळा,तसेच मावळ्याचे वस्त्र परिधान केलेले आंदोलनकर्ते मोर्चाचे आकर्षण ठरले.
या आहेत मागण्या
ऐतिहासिक पन्हाळगड व पावनगडाचे तात्काळ संवर्धन व जतन करुन तात्काळ जीर्णाध्दार करणेत यावा. पन्हाळगडावरील दारु दुकान तात्काळ बंद करण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. पन्हाळ गडासाठी 1000 कोटी रु.तात्काळ मंजुर करण्यात यावे. पन्हाळगडावर प्री वेडींग व फोटोशुटला बंदी घालावी.ग डाचे पावित्र्य जपावं, आदी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात,अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, निवेदनाची प्रत पुरात्त्व विभाग,पन्हाळा,नगरपरिषद मुख्याध्याकारी पोलिस निरीक्षक पन्हाळा पोलिस ठाणे यांना देखील सादर करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील,तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड,तालुका सचिव लखन लादे,उपाध्यक्ष अमर बचाटे,विभाग अध्यक्ष अक्षय कांबळे,महिला तालकाध्यक्ष शुभांगी शेलार, दत्ता सावंत,सतिश तांदळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









