Sandeep Deshpande on Attack : माझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. या हल्ल्यामागे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. फरार निलेश पराडकर पोलीसांच्या तावडीत सापडल्यावर याचा खुलासा होईल असेही ते म्हणाले आहेत. तिन महिन्यापूर्वी त्यांच्यावर हल्ला झाला होता.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता ही बाब जबाबात उघड झाली आहे.मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील म्हणून खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. निलेश पराडकरचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.
नेमके काय घडलय
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर 3 मार्च 2023 ला हल्ला झाला होता. हा हल्ला पाच ते सहा जणांकडून झाला होता. या हल्ल्यात अशोक खरात, निलेश पराळकर आणि अन्य जणांचा समावेश आहे.यापैकी मुंबई पोलीस क्राईम ब्रॅचंने अशोक खरात याला हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी अटक केली होती.खरात हा महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेचा पदाधिकारी आहे.दुसरीकडे निलेश पराडकर हा फरार आहे, असं पोलीसांनी आरोपपत्र दाखल केलयं.या हल्ल्याला राजकीय अॅगल नव्हता असा दावा पोलीसांकडून करण्यात आला आहे.








