संगमेश्वर, प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरी येथील सभेसाठी निघालेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाला. यात मनसे कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. देवेंद्र जगन्नाथ साळवी (वय -42 ) रा. मालगुंड सद्या राहणार बोरीवली मुंबई असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी देवेंद्र साळवी रत्नागिरीच्या दिशेने जात होते. यावेळी तुरळ येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. यात साळवी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मनसेचे बाळा नांदगावकर, मनसे उपनेते संदीप देशपांडे, मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण, नंदू फडकले आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख यांच्यासह सचिन कामेरकर, कांबळे, शांताराम पंदेरे, सोमनाथ आव्हाड, विश्वास बरगाले आदी घटनास्थळी दाखल झाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









