जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले आहे. शनिवारी निकाल लागणार आहे. त्यानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत. सरकार स्थापन करताना आमदार तसेच मंत्र्यांना शपथ दिली जाते. ती शपथ बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये घ्यावी आणि सुवर्णसौध येथेच सरकारची स्थापना करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी हे निवेदन राज्यपालांकडे पाठविले आहे. बेळगावमये सुवर्णसौधची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी वर्षातून एकदा अधिवेशन घेतले जाते. मात्र त्यानंतर मंत्री असो किंवा अधिकारी बेळगावकडे पाठ फिरवितात. त्यासाठी बेळगाव येथेच सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे शपथ देताना भ्रष्टाचारमुक्त आणि शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी मी काम करेन, असा देखील उल्लेख करून आमदारांना शपथ घेण्यास भाग पाडावे, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश नायक, सोमू रैनापूर, रविंद्र सोपन्नावर, माधव राणे, निलेश अनगोळकर, पांडुरंग बिरनगट्टी, विश्वनाथ के., रंगाप्पा गंगारे•ाr, शेखर तिलारी, गिरीश गंगारे•ाr, यक्केरप्पा तळवार, विष्णू कांबळे, अनिल अनगोळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









