बेळगाव :
नेहरूनगर पीके क्वॉर्टर्स येथे मागील अनेक वर्षांपासून सुविधांची वानवा आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ ऊर्फ राजू सेठ यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणी, गटारी यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
पीके क्वॉर्टर्स परिसरात महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी राहतात. परंतु, कामगारांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे आमदार सेठ यांनी शनिवारी परिसराची पाहणी करून येथील समस्या दूर केल्या जातील, असे आश्वासन नागरिकांना दिले. यावेळी युवा नेते अमन सेठ यांच्यासह लोकप्रतिनिधी उपलब्ध होते.
17









