मालवणात शिवजयंती सोहळा उत्साहात
मालवण | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्या निमित्त आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाले. महाराजांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय… या जयघोषाने परिसर दणाणून गेला. दरवर्षी शिवजयंती सोहळा निमित्ताने आमदार निलेश राणे किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतात . नतमस्तक होतात त्यानुसार त्यांनी दर्शन घेतले. महाराज हे आम्हा सर्वांचे दैवत आहे. या दैवताची पुजा केली ,आशीर्वाद घेतले. असे आ. निलेश राणे यांनी सांगितले.
शिवजयंती दिनी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली असे ट्वीट केले आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदार निलेश राणे म्हणाले, राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना देशाची संस्कृतीच माहित नाही. गांधी आणि ठाकरे यां दोंघांमध्ये घमेंड अधिक आहे. राहुल गांधी यांनी माफी मागितलीच पाहिजे. असेही आ. निलेश राणे म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, संजू परब, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, दादा साईल, राकेश सावंत, राजेश सावंत, राजू बिडये, निषय पालेकर, सनी कुडाळकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, दीपालक्ष्मी पडते, माधुरी तुळसकर, आशा वळपी, सिद्धी शिरसाठ, सोनाली पाटकर, अंजना सामंत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, ऋषिकेश सामंत, विराज गुडेकर यांसह अन्य पदाधिकारी शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते









