जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
रामदुर्गचे आमदार महादेवप्पा यादवाड यांनी वकिलांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. त्यामुळे वकील संतप्त झाले असून आमदार यादवाड यांनी माफी मागावी यासाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.
रामदुर्ग तालुक्मयातील बटकुर्गी येथे शेतकऱयांच्या जमिनी संपादन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी आम्ही वकिलांशी चर्चा करू, असे शेतकऱयांनी सांगितले. त्यावर वकिलांशी चर्चा केलात तर तुमचे सर्व पैसेच काढून घेतील, असे सांगून त्यांनी वकिलांवर संशय निर्माण केला. वकिलांच्याबद्दल जे अपशब्द काढले आहेत, त्यामुळे संपूर्ण जिह्यातील वकिलांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर तातडीने बेळगाव बार असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी गिरीश पाटील, ऍड. जगदीश सावंत, ऍड. अमर यळ्ळूरकर, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. मारुती कामाण्णाचे, सदस्य ऍड. इरफान बयाळ, ऍड. टी. एल. पटेल, ऍड. सुनील काकतकर, ऍड. गंगाधर मठ यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.









