वार्ताहर /कणकुंबी
खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा तालुका कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर, कार्याध्यक्ष मुख्याध्यापक एन. डी. पाटील, कार्यदर्शी मुख्याध्यापक अनिल कदम तसेच तालुका सहशिक्षक संघटनेचे अध्यक्ष टी. आर. पत्री, मणतुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एम. पाटील, जांबोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर, गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. यळ्ळूरकर, कापोली हायस्कूलचे सहशिक्षक संजीव वाटुपकर, गर्लगुंजी ज्योतिराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक के. एम. पाटील, तोपिनकट्टी हायस्कूलचे मुख्याध्यापक मारुती आरगु, ओलमणी हायस्कूलचे सहशिक्षक व तालुका को-ऑप. सोसायटीचे चेअरमन ए. जे. सावंत, इदलहोंड हायस्कूलचे शिक्षक गजानन धामणेकर व तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळांचे शिक्षक, सदस्य उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर हे कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे सल्लागार असून शिक्षक संघाच्यावतीने क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या विज्ञान मॉडेल उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमदार या नात्याने तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते कटिबद्ध असून तालुक्यात शिक्षक भवनची उभारणी करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
विश्वभारत सेवा समितीच्यावतीने आमदार हलगेकर यांचा सत्कार
अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी के. एम. पाटील, मुख्याध्यापक एम. वाय. पाटील आदी उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर हे विश्व भारत सेवा समितीच्या गर्लगुंजी येथील ज्योतिराव फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. या हायस्कूलना सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.









