आमदार विनय कोरे यांच्या विशेष मागणीतून निधी प्राप्त
शाहूवाडी प्रतिनिधी
शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून मलकापूर नगर परिषदेला जिल्हा नियोजन मंडळातून तीन कोटी पन्नास लाख रुपये चा निधी प्राप्त झाला. तर उर्वरित विकास कामासाठीही निधी प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर व माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली .
मलकापूर शहरातील विविध विकास कामासाठी आवश्यक असलेला आणि प्रलंबित राहिलेला निधी तात्काळ उपलब्ध व्हावा . यासाठी आमदार विनय कोरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती . या मागणीची दखल घेऊन जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मलकापूर नगर परिषदेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत दोन कोटी, नागरी दलित वस्ती सुधार योजना १५ लाख रुपये ,अग्निशमन सेवा बळकटीकरण दहा लाख रुपये आणि नागरी वस्ती सुधार योजना एक कोटी पंचवीस लाख रुपये असा एकूण तीन कोटी पन्नास लाख रुपयाचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे .
मलकापूर शहरातील अन्य प्रलंबित विकास कामासाठी देखील शासनाच्या वतीने निधी उपलब्ध होणार आहे विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने ‘ खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले .भाजपा, जनसुराज्य शक्ती पक्ष , कर्णसिंग गायकवाड गट व डेमोक्रॅटिक या आघाडीच्याच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत . विकास कामाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांचे देखील विशेष सहकार्य लाभत आहे .
दरम्यान मलकापूर शहरातील अन्य विकास कामासाठी देखील जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही , देखील यावेळी आमदार विनय कोरे यांनी दिली असल्याची माहिती अमोल केसरकर व दिलीप पाटील यांनी दिली .