कुडाळ । प्रतिनिधी
आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ स्नेहा वैभव नाईक यांनी कुडाळ विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत कुडाळ नगरसेविका श्रेया गवंडे व श्रुती वर्दम उपस्थित होत्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत व तालुका प्रमुख राजन नाईक उपस्थित होते. यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचवल्या आहेत. उबाठाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी दोन अर्ज दाखल केले आहेत. सौ नाईक यांनी सोमवारी अर्ज खरेदी करून आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.









