मालवण प्रतिनिधी
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर यांच्या पालखी प्रदक्षिणेचे आमदार वैभव नाईक यांनी पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, नितीन राउळ, दत्ता पोईपकर, तृप्ती मयेकर, निनाक्षी शिंदे मेथर, संदीप लाड यांसह शिवसैनिक व समस्त मालवणवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.









