प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी गुरुवारी भांदुर गल्ली येथील सरकारी मराठी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी शाळांमध्ये चांगल्या सुविधा पोहोचाव्यात या दृष्टीने त्यांनी शाळेची पाहणी करून विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे? या विषयी त्यांनी प्रत्येकाशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनीही आपल्याला जे वाटते ते आमदार सेठ यांच्यासमोर व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.









