कसबा बावडा प्रतिनिधी
कुंभी- कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जाहीरपणे नरके पॅनलला पाठिंबा दिला होता. त्यामुळे चंद्रदीप नरके गट छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याचे प्रतिपादन कुंभी- कासारी साखर कारखान्याचे संचालक विलास पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील आयोजित सभेत ते बोलत होते.
जयसिंगराव आळवेकर यांनी राजाराममधील सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारावर हल्ला चढवला. महाडिकांनी राजाराम कारखान्याच्या जिवावर बेडकीहाळचा कारखाना उभारला. राजारामच्या सभासदांना देशोधडीला लावण्याचे पाप महाडिकांनी केले आहे.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आम्ही प्रश्न एक विचारतोय. सत्त्ताधारी मात्र दुसरेच उत्तर देवून विषय बाजूला नेवून सभासदांची दिशाभूल करताहेत. मात्र आता कार्यकर्त्यांनी संयम राखावा असे सांगत परिवर्तन आघाडीला विजयी करा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित सभासदांना केले.
हेही वाचा >>> संस्था गिळंकृत करणे हिच सतेज पाटलांची कपटनिती; खासदार धनंजय महाडिक यांचा घणाघात
या सभेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, श्रीकांत बोरे, आनंदराव पाचाकटे, राजकुमार चौगले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी संचालक जयसिंगराव पाटील, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बी. एच. पाटील, के वाय पाटील (ठाणेकर), बाजीराव पाटील, अंबाजी पाटील, नामदेव पाटील, जयसिंगराव हिर्डेकर, शरद मिसाळ, विकास पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.