कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये केंद्र स्थानी असलेले आणि जिल्ह्यासह राज्यपातळीवर ज्यांच्या राजकिय संघर्षाची चर्चा केली जाते असे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक हे आज एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बंटी आणि मुन्ना अशा नावाने परिचित असलेल्या जिल्ह्यातील दोन मातब्बर विरोधकांनी एकाच व्यासपीठ हजेरी लावल्याने अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या आहेत तसेच या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा VIDEO >>> मुन्ना आणि बंटी एकाच व्यासपीठावर; राजकिय चर्चेला उधाण
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कसबा बावड्यात कृषी विभागाच्यावतीने प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या शासकिय कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर होते. त्यामुळे दोघाही नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जातीने उपस्थिती लावली. आमदार हसन मुश्रीफ हे कार्यक्रमास्थळी पोहचण्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी थांबणेच पसंत केले. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले, तर इमारतीच्या आत खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत केले.
पालकमंत्र्यांचे आगमनानंतर आमदार सतेज पाटील यांच्य़ा समवेत इमारतीमध्य़े प्रवेश केला. त्यानंतर तीनही नेते एकत्र बसून फेटे बांधून घेतले. बंटी आणि मुन्ना य़ांच्य़ा मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटा बांधून घेतला. यावेळई दोघांच्याही चेहऱ्यावर हसरा भाव दिसून येऊन वातावरण हलके करण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला. माध्यमांनी हा क्षण टिपून घेतला.
कार्यक्रमानंतर माध्यमांनी दोन नेत्यांच्या एकत्रित येण्याला नविन राजकिय समिकरणाची नांदी आहे काय असा प्रश्न पालकमंत्र्याना विचारला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं मी सहकार्य घेणार आहे. मी ज्या ज्या ठिकाणी असेन तिथं हे दोघे एकत्र असतील.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ऱाष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाने कोल्हापूरच्या दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी “शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करेन,” अशी बोलकी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.








