छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रांवर पार पडत असणाऱ्या मतदानावर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. कोल्हापूर शहरामध्येही दोन केंद्रांवर मतदान होत असून त्यातील संस्था गटातील मतदानासाठी सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आमदार सतेज पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत.
हेही वाचा >>> राजाराम कारखान्यासाठी दुपारी 12 पर्यंत 68.76 टक्के मतदान,जिल्ह्यात चुरशीचे वातावारण
संस्था गटातील मतदार सभासदांना घेऊन आमदार सतेज पाटील हे सेंट झेविअर्स हायस्कूल या मतदान केंद्रावर हजर झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आमच्याकडे संस्था गटातील 75 मतदान असून सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर द्यायला वेळ नाही. तसेच ऊसाला दोनशे रुपये दर कमी मिळतो हे शेतकऱ्यांना पटलेलं आहे त्यामुळे राजाराम कारखान्यात परिवर्तनाची लाट आहे. जिल्ह्यातील अनेक गावात आमच्याबाजूने उत्साहात मतदान आहे. सत्ताधाऱ्यांना मंडळाचे बूथ टाकायला जागा नाही. यंदा छत्रपती राजाराम कारखान्यात परिवर्तन होणारच. सत्ताधाऱ्यांनी सभासदांना गृहीत धरले आहे. हे पुर्णता चुकिचे आहे. धनंजय महाडिक हे मोठे बोलतात त्यांच्य़ा मोठ्या बोलण्याला अर्थ नाही.” अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.









