आमदार सतेज पाटील आरोप; टँकरचा प्रश्न येणार म्हटल्यावर विरोधक पळाले; संस्थां नोंदणीचा प्रश्न उपस्थित करणारे अज्ञानी
कोल्हापूर प्रतिनिधी
टँकरच्या माध्यमातून महाडिकांना महिन्याला 15 ते 20 कोटी रुपये बिल मिळत होते. वीस वर्षांत त्यांनी टँकरच्या माध्य़मातुन गोकुळमध्ये 400 कोटींचा व्यवहार केला असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. तसेच काही संस्थांनी टँकरची चौकशी होवून वसुली करणार का असा प्रश्न विचारला होता. सभेमध्ये टँकरचा हा प्रश्न येणार हे लक्षात येताच विरोधकांनी सभेमधून पळ काढल्याचा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.
गोकुळची 60 वी सर्वसाधारण सभा सोमवारी महासैनिक दरबार हॉल येथे झाली. सभा संपल्यानंतर आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, विरोधकांनी एकाच लेटर पॅडवर अनेक प्रश्न वेगवेगळ्य़ा संस्थांच्या नावावर पाठवले होते. गोकुळे या प्रश्नांची उत्तरे तयारी केली आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सभेमध्ये देण्यात आली. आयत्यावेळच्या प्रश्नांमध्ये एका संस्थेने मागील काळात महाडिक यांचे टँकर किती होते. यामधून त्यांना किती पैसे दिले. असा प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या वीस वर्षात टँकरच्या माध्यमातून महाडिकांनी 400 कोटींचा व्यवहार केला. त्यांना थुपास होता. गोकुळच्या वाहतुक व्यवस्थेतील 35 टक्के वाटा महादेवराव महाडिक यांच्या व्यंकटेश्वरा संस्थेस द्यावा, असा नियम केला होता. हे अक्षेपार्ह नव्हतं का, यावर काही कारवाई होणार का, वसुली लावणार का असा ही प्रश्न होता. या प्रश्न येणार हे लक्षात येताच विरोधकांनी सभेमधून पळ काढला. या प्रश्नांची उत्तरे ऐकण्याची मानसिकता त्यांची नसल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
संस्थांचा प्रश्न विचारणार अज्ञानी
संस्थांच्या नोंदणीबाबत प्रश्न उपस्थित करणारे अज्ञानी आहेत. सहकारातील कायद्यानुसार सुनावणी घेवून संस्थांची नोंदणी केली जाते. विरोधकांचा ज्ञान कमी असल्याने त्यांच्याकडून असे प्रश्न विचारले जात असतील असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.
टँकर बंद झाल्याने 25 ते 40 विरोधक आले होते
आजच्या सभेला जे काही 25 ते 40 विरोधक आले होते. ते त्यांचे टँकरमध्ये बंद झाले म्हणून आले होते. महाडिकांचे टँकर बंद झाले. पुण्यातील जावयाची एजन्सी बंद झाली. फलटणमधील त्यांच्या चुलत सासऱयांची जास्त पैशाची एजन्सी बंद झाल्याने ते सभेला आले होते. हे सगळं बंद झाले नसते, तर ते कदाचित आज आमच्यासोबत व्यासपीठावर असते, असा उपरोधिक टोलाही आमदार महाडिक यांनी लगावला.









