ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत शेवत्या क्षणी शिंदे गटामध्ये (Shinde Group) सहभागी झालेले आमदार संतोष बांगर हे या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आता आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन हा वाद सुरु झाला. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली आहे.
मंत्रालयात जात असताना कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ घालत पोलिसांसोबत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी अखेर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. याआधीसुद्धा बांगर सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणे यावरुन वादात अडकलेत.
यावेळी बांगर यांनी, आता तू मला शिकवणार का?’ असे म्हणत पोलिसाला शिवीगाळ करत हुज्जत घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा वाद सोडवण्यासाठी अखेर काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. याप्रकरणी संबधित पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे. त्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. आता याप्रकरणावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, संतोष बांगर यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझा पोलिसांसोबत कोणताही वाद झाला नाही आणि मी कोणतेही शिवीगाळ केली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपास म्हणजे ’, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.








