या अगोदर उरूण या नावाने हे शहर परिचित होते
इस्लामपूर: इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर’ नामकरणासाठी अनेक महान व्यक्तींनी ज्या-त्या काळात मागणी लावून धरली. सुरुवातील डॉ. हेडगेवार, बाळासाहेब ठाकरे, पंत सबनीस यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद उत्सव मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर येवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
आ.खोत म्हणाले, १८ डिसेंबर १९३८ इस्लामपूरचा ईश्वरपूर हा पहिला उल्लेख हेडगेवार यांनी केला होता. त्यानंतर १९८६ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी यल्लमा चौकातील सभेत इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याची घोषणा केली. या शहराला इस्लामपूर हे नावच नव्हते. या अगोदर उरूण या नावाने हे शहर परिचित होते.
आदिलशाची छावणीच्या काळात या शहराचे नाव इस्लामापूर करण्यात आले होते. इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर हे महायुतीच्या सरकारमुळेच शक्य झाले आहे. ईश्वर व अल्ला एकच आहेत. कोणी याचा द्वेष करू नये.
शहरातून काढलेल्या मिरवणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, तसेच अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
नामांतराचे पुस्तक बनवणार
यावेळी खोत म्हणाले, शहराचे नामांतर कसे झाले. याचे आम्ही महायुतीच्यावतीने एक पुस्तक बनवणार असून त्यामध्ये हे पुरावे, माहिती, नामांतरासाठी केलेला पाठपुरावा याची माहिती देवून हे पुस्तक प्रकाशन केले जाईल. त्याच्या प्रति येथील वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील.