कुपवाड/प्रतिनिधी
विजयनगर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास अभिवादन करण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी मंगळवारी दुपारी अचानक भेट दिली.
यावेळी अहिल्यादेवी स्मारकास अभिवादन केल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी व नगरसेवक विष्णू माने यांच्याहस्ते आमदार रोहित पवार यांना धनगरीढोल, घोंगडी व काठी देऊन पारंपारिक पद्धतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक मनोज सरगर, युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सागर माने, गणेश माने, अमित शिंदे यांसह सांगली व कुपवाड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच धनगर समाजाचे पदाधिकारी प्रभाग आठमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.