गडहिंग्लज,प्रतिनिधी
Rohit Pawar : जाती-जातीत, धर्मा धर्मात वाद लावत भाजपने आपले राजकारण चालवले आहे. कुटुंबाबरोबरच राष्ट्रवादी फोडण्यात ही भाजपच जबाबदार असल्याची कडवट टीका करत एकच नेता शरद पवार म्हणणाऱ्यांनी भीतीपोटी भाजप बरोबर सत्तेत गेले त्यांना जनता ओळखून असून मेहुण्यावर विश्वास ठेवत आमदार करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत हे आमदार सत्तेत गेले अशी टीका आमदार राजेश पाटील यांचे नाव टाळत आमदार रोहित पवार यांनी गडहिंग्लज येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची २५ ऑगस्ट रोजी कोल्हापूरला जाहीर सभा होत आहेत.या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी दुपारी गडिंग्लज येथे पार पडला या मेळाव्यात ते बोलत होते. सुरुवातीस शिवप्रसाद तेली यांनी स्वागत केले.यावेळी माजी सभापती अमर चव्हाण,चंद्रकांत कांबळे,अंकुश रणदिवे, गणेश फाटक,अजय कोकीतकर,शिवानंद माळी, मुकुंदराव देसाई,रामराज कुपेकर शिवाजीराव खोत, सक्षमा सलगर,मेहबूब शेख,माजी आमदार जयदीप गायकवाड यांनी भाषणे केली.
समाजात वाद निर्माण करणाऱ्या विचारांच्या विरोधात शरद पवार लढत आहेत. राज्यातील जनतेचा प्रचंड मोठा विश्वास त्यांच्यावर असल्याचे सांगत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.दिल्ली पुढे झुकायचे नाही हे धोरण खासदार शरद पवारांचे असल्याचे सांगितले.त्याच्या पाठबळावर जनता त्यांना पाठीशी राहत असल्याचे स्पष्ट केले.या मेळाव्याला युवा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील,सुनील गव्हाणे,विकास लवांडे,शशिकांत वर्पे,आशाताई भिसे,भैरू खांडेकर,शिवाजी सावंत,उदयराज पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.








