कोल्हापूर :
कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. ऋतुराज पाटील यांनी मतदानाच्या जनजागृतीबद्दल आपले मत व्यक्त केले . यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आणि लोकशाही सक्षम करण्यासाठी मी मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. या निमित्ताने मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की, आपण सर्वांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावावा.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळ या निवडणुकीच्या निमित्ताने मला दक्षिणच्या सर्व जनतेने अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, पाठबळ दिले आणि आशीर्वादही दिला. याच जोरावर या निवडणुकीमध्ये मी निश्चित विजयी होईन आणि महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला बहुमत देईल, असा मला विश्वास वाटतो.








