दांडेलीत पावसामुळे झालेल्या हानीची घेतली माहिती
बेळगाव : हल्याळ व दांडेली तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा गुरुवारी आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. हल्याळ तहसीलदार कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत हल्याळचे तहसीलदार प्रवीण हुच्चण्णावर, दांडेलीचे तहसीलदार शैलेश परमानंद व इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे झालेले नुकसान, कृषी, पाटबंधारे, वीज आदी इतर शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांशीही आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी चर्चा केली. पावसामुळे झालेली रस्त्यांची हानी, घरांची पडझड, पीकहानी आदीविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्वरित भरपाई देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.









