लखनौ :
समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार पूजा पाल यांनी अखिलेश यादव यांना लक्ष्य केले आहे. समाजवादी पक्षाकडून पोसले जाणारे गुंड आणि माफियांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा दावा पूजा पाल यांनी सोमवारी केला. समाजवादी पक्षाचे गुन्ह्यांचे संरक्षण देण्याचे धोरण आहे. माझे पती राजू पाल यांची हत्या समाजवादी पक्षाचे राज्यात सरकार असताना झाली होती. याचमुळे समाजवादी पक्षाने पोसलेले गुंड माझी हत्या घडवून आणू शकतात अशी भीती वाटत असल्याचे पूजा पाल यांनी म्हटले आहे. पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देणे हाच माझा उद्देश होता. योगी आदित्यनाथ सरकारने मला न्याय दिला. परंतु सप अजूनही गुन्हेगारांना पोसत असल्याने भावी पिढ्या त्याला माफ करणार नसल्याचे पूजा पाल यांनी म्हटले.









