सांगरुळ परिसरातील संपर्क दौऱ्यातून केले आवाहन
सांगरूळ / वार्ताहर
स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली आहेत .सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न विधिमंडळात मोठ्या ताकदीने मांडून त्याची सोडवणूक केली आहे . पी एन पाटील यांचे आचार आणि विचार जोपासण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन करवीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले .
बहिरेश्वर म्हारूळ आमशी पासार्डे बोलोली उपवडे सहबारा वाड्या खाटांगळे सांगरुळ गावातून आयोजित संपर्क दौऱ्यात ते बोलत होते .राहुल पाटील यांचे संपर्क दौऱ्यातील प्रत्येक गावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी करत नागरिकांशी संवाद साधला .महिला कार्यकर्त्यांनी गावागावातून त्यांचे औक्षण केले . गावागावातून आमदार पी एन पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन व नवीन कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना राहुल पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय आणि सहकार क्षेत्रात वाटचाल करताना समाजकारणाला प्राधान्य दिले आहे .मतदार संघातील गावे आणि वाड्यावर वस्त्यांना भरघोस निधी देऊन विकासाची गंगा आणली आहे . हयातभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक मोठ्या तळमळीने केली आहे .यामुळे जनता व पी एन पाटील साहेब यांच्यामधील निर्माण झालेले आपुलकीचे नाते यापुढे प्रामाणिकपणे व निष्ठेने जोपासण्याचे मी आपल्याला अभिवचन देतो . यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज असून आगामी निवडणुकीत मला पाठबळ द्यावी अशी भावनिक साद राहुल पाटील यांनी यावेळी दिली आहे.
सांगरुळ परिसरातील संपर्क दौऱ्याच्या समारोप सांगरूळ येथे करण्यात आला .यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी राहुल पाटील यांच्या दौऱ्यास युवा वर्गापासून अबाल वृद्ध नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत असून पी एन पाटील यांच्याप्रमाणे या परिसरातील जनता राहुल पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी ग्वाही दिली . या संपर्क दौऱ्यात बहिरेश्वर म्हारूळ आमशी पासार्डे बोलोली उपवडे सहबारा वाड्या खाटांगळे सांगरुळ गावातील ग्रामपंचायत सेवा संस्था दूध संस्था पतसंस्थांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .