कसबा बीड/ प्रतिनिधी
गेली अनेक दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी व बँकेत ED धाडीचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच संताजी घोरपडे साखर कारखाना व ब्रिक्स कंपनीबाबत केडीसी बँकेकडून त्या काळात केलेला व्यवहार या संदर्भात त्या कार्यकाळामध्ये असणाऱ्या प्रमुख संचालकांना 24 मार्चला ED कार्यालयाकडून समन्स नोटीस बजावली होती. त्यावेळी अधिवेशन सुरू असल्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व के डी सी सी बँकेचे संचालक यांना हजर राहता आले नाही. म्हणून ईडी कार्यालयाच्या नोटीसचा मान राखत आज स्वतःहून आमदार पाटील यांनी ED कार्यालयास भेट दिली.
आमदार पी. एन. पाटील ED कार्यालयात हजर असल्याच्या बातम्या दिवसभर टिव्ही चॅनल आणि सोशल मीडियावर फिरत होत्या. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आ. पाटील यांनी आपण ईडी कार्यालयात का हजर राहिलो याचा खुलासा केला. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.








