आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण
मालवण | प्रतिनिधी
मालवण एसटी बस आगारास काही दिवसांपूर्वी नवीन पाच बस महायुती शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाल्या होत्या. आता आणखी पाच बसेस पुन्हा प्राप्त झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लवकरच संपन्न होणार आहे. जनतेच्या सेवेसाठी महायुती तत्पर आहे. खासदार नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघात गतिमान विकास सुरूच राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी माहिती देताना सांगितले.आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लवकरच नव्या बसचे लोकार्पण होणार असून यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे. असे दिपक पाटकर यांनी माहिती देताना सांगितले.









