दिल्लीत पोहचताच नवनीत राणांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.
आॅनलाईन टीम/तरूण भारत
दिल्ली: कमी तापमानात जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी तैनात आहेत त्यांना माझा सॅल्यूट आहे. लेह लडाखमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याठिकाणी सर्व समाजातील लोक मोदींना मानतात. याठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात विद्यालये स्थापन केली आहेत. मोदींनी लडाखच्या जनतेसाठी खूप काम केले आहे. संसदीय समितीचा अभ्यास दौरा करण्यासाठी गेलेले राणा दाम्पत्य आज दिल्लीत पोहचताच विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत (Sanjay Raut)आणि आमच्यात बोलणं झालं, पण आमची लढाई अजून संपली नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
संसदीय समितीचा अभ्यास दौरा करण्यासाठी राज्यातील जवळपास ३० खासदार या दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्रातून संजय राऊत आणि राणा दाम्पत्य हे लडाखमध्ये एकत्र होते. त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या संदर्भात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, माझी लढाई माझा विकास आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. जर संजय राऊत आहेत म्हणून मी समितीच्या अभ्यासासाठी गेले नसते तर माझ्या कामावर अन्याय आणि विकासात अडथळा मी निर्माण केला असता. मी जबाबदारीने वागले. आमच्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही. महाराष्ट्राची संस्कृती मी जपली. माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. संजय राऊत आणि आमच्यात बोलणं झालं, पण आमची लढाई अजून संपली नाही. वैचारिक लढाई सुरुच राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, संजय राऊत यांच्यावर अत्याचार झाला नाही.उलट आमच्यावर अत्याचार झाला आहे. राज्य सरकारने आमच्यावर अत्याचार केला आहे. १४ दिवस आम्ही जेलमध्ये राहीलो आहे.संस्कृती आम्ही जपली आहे. ते अडथळे आणत आहेत. माझी लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे ती सुरुच राहणार आहे.
संजय राऊत आणि आमच्यात बोलण सुरु असताना एका मुलीने प्रश्न विचारला की, महिलांना पुढ येऊ देत नाहीत असा का होत? तेव्हा मी म्हणाले, मी सध्या १४ दिवस जेलमध्ये जाऊन आलीय आणि मला जेलमध्ये पाठवणारे हेच लोक आहेत तेव्हा राऊतांकडे याचे काहीच उत्तर नव्हते असेही त्या म्हणाले.