तिरुअनंतपुरम
केरळमध्ये सत्तारुढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार अन् अभिनेता एम. मुकेश यांना एका अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर नोंद बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी एसआयटीने मंगळवारी अटक केली. यानंतर मुकेश यांची वैद्यकीय अन् पोटेंसी टेस्ट करविण्यात आली. सत्र न्यायालयाने चालू महिन्याच्या प्रारंभी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने त्यांनी त्वरित सुटका देखील करण्यात आली आहे. यापूर्वी मुकेश हे मंगळवारीच एसआयटीसमोर हजर झाले होते. एका अभिनेत्रीने मुकेश यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मुकेश यांच्या विरोधात वडक्कनचेरी पोलीस आणि मरडु पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत.









