वार्ताहर /किणये
बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या मंगळवार दि. 18 रोजी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी प्रारंभी लक्ष्मी हेब्बाळकर या हिंडलगा येथील गणपती मंदिरात सकाळी 7 वा. जाऊन गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर 9 वा. सुळेभावी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर 11 वा. शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती त्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.









