जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित
सावंतवाडी । प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या अनेक योजना असून त्या योजना प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने आणि काही अडचणी असतील तर त्या कशा सोडवल्या जातील यासाठी केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि नवा आराखडा करता येईल का यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वन विभागाचे तसेच इतर प्रश्न सोडवता येतील का या सर्वांचा एकंदरीत अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल. येत्या 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या वेळी कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही केंद्रस्तरावरील समस्या तसेच नवीन विकासात्मक कामे सुचवता येतील का? या दृष्टीने एक प्रारूप अहवाल आपण मुख्यमंत्री श्री फडणवीस त्यांच्याकडे सादर करणार अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक केंद्र पार पडली यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर बोलत होते .
केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात काय करता येईल . काही समस्या असतील तर त्या कशा सोडवाव्यात या संदर्भात एक अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने श्री केसरकर बैठकीच्या निमित्ताने सावंतवाडीत आले होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील , उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी , प्रांताधिकारी हेमंत निकम सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील , मुख्याधिकारी सागर साळुंखे, वेंगुर्ले , दोडामार्ग तहसीलदार ,कार्यकारी अभियंता महेंद्र केणी आदी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीत उपस्थित होते .









