आ. पाटील यांच्याकडून अडीच लाख रुपयांची मदत
इस्लामपूर: शहरातील चोरीच्या घटना, व अन्य गुन्हयांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही दुरुस्तीची महिलांची मागणी होती. आ. जयंत पाटील यांनी तात्काळ प्रतिसाद देत दुरुस्तीसाठी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली.
महिलांच्या हस्ते ही मदत पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सीसीटीव्ही दुरुस्त होतील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला. नादुरुस्त असलेल्या कॅमेरे दुरुस्तीसाठी अडीच लाख खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती निरीक्षक संजय हारुगडे यांनी आ.पाटील यांना दिली. पाटील यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी रुपाली पाटील, गीता पाटील, शैलजा रानमाळे, शबाना पटेल, आदी उपस्थित होत्या








